रमेश पानसे - लेख सूची

शिक्षण: शिक्षककेंद्री व विद्यार्थिकेंद्री

सामान्यतः मुलांचे औपचारिक शिक्षण शाळांतून होत असते. हे शिक्षण प्रामुख्याने वर्गांतून होत असते. आज बहुसंख्य शाळांतील दर्जाविषयी होणारी ओरड ही मूलतः वर्गामधील शिक्षणाच्या दर्जाविषयीची असते. अनेक वरवरचे उपाय सार्वत्रिकरीत्या अंमलात आणूनही शिक्षणाच्या गुणवत्तेत फरक पडत नाही, हा आपला अनुभव आहे. ही आपली खंतही सार्वत्रिक स्वरूपाची आहे. शाळांमधील आणि शाळांतील वर्गांमधील शिक्षणाची गुणवत्ता अतिशय कमी असणे, …

पावसानंतरचे ऊन

माणसाच्या मुलावर जन्मतःच धर्म लादला जातो, ही व्यथित करणारी घटना आहे. प्राण्यांच्या बाबतीत असे घडत नाही. त्यांना धर्म नसतो; निसर्गदत्त असा फक्त ‘स्वधर्म’ असतो. जगणे—-मैथुन आणि मृत्यू या जीवनचक्राबाहेर त्यांचे जीवन युगानुयुगे गेलेले नाही. प्राण्यांना नाही अशी एक महान गोष्ट माणसाला प्राप्त झाली आहे. ती म्हणजे विकसित आणि विकसित होणारा मेंदू. या मेंदूच्या जोरावर माणसाने …

शिक्षणाचे स्वातंत्र्य

श्री. निर्मलचंद्र यांच्या ‘नयी तालीम का नया आयाम—-लोकशिक्षण’ या हिन्दी पुस्तकात एक प्रसंग वर्णन केला आहे. हा प्रसंग आहे १९४७ सालचा. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांमधला. एका कार्यक्रमात ध्वजारोहणाला विनोबा होते. त्यांनी तिरंगी ध्वज फडकावला. नंतर म्हणाले, “हा तिरंगी ध्वज मिनिटभर उतरवून ‘युनियन जॅक’ तेथे फडकवण्याची मला इच्छा आहे.” लोक चकित झाले. गहजब माजू …